मुंबई: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर आज सोन्याचा दर मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात 0.02 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, चांदीच्या दरात 0.76 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मंगळवारी सकाळी भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 12 रुपयांनी घसरून 50,310 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याचा दर आज 50,351 रुपयांवर उघडला होता. मात्र, बाजार सुरू होताच, भाव 50,283 रुपयांपर्यंत गेला. सध्या सोन्याचा भाव 50,310 रुपयांवर आहे.

तसेच, मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज चांदीचा दर आज 441 रुपयांनी वाढून 58,119 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा भाव 57,960 रुपयांवर उघडला होता. त्यानंतर तो 58,257 रुपयांवर गेला. पण नंतर चांदीचा दर थोडा घसरला आणि 58,119 रुपयांवर व्यवहार सुरू झाला.