मुंबई: रेट्यामुळे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने नोकरभरतीवरील निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय सोमवारी (३१ ऑक्टोबर) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील विविध विभागातील ७५ हजार पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सरकारी विभागातील सरळसेवा कोट्यातील ७५ हजार पदे भरण्याची सरकारची योजना आहे. शासनाच्या ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली आहे.

तसेच, ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभागांमधील गट अ, गट ब, गट क मधील (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे.