मुंबई: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेला म्हणजे आज देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आज (मंगळवार) 1 नोव्हेंबर 2022 पासून 19 किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी झाले असले, तरी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

दरम्यान, देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला 14 किलो घरगुती आणि 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात.