नवी दिल्ली: शिवसेना नेमकी कुणाची?, धनुष्यबाण कुणाला मिळणार?, शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, अशा विविध मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस निर्णायक असणार आहे. सकाळी १०.३० वाजता या सुनावणीला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर निर्णय घेण्यासाठी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्याने ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती.