Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : पोलिसात गुन्हा दाखल

0 2,546

आटपाडी : एका अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून ती गरोदर राहिल्यानंतर कोणाला काही सांगितले तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याची फिर्याद आटपाडी पोलिसात दखल असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jawale Jewellers

याबाबत आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलीसोबत पाच ते सहा महिन्यापूर्वी महेश किशोर पवार याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, त्यामध्ये ती गरोदर राहिली. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या भावांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. तसेच पोटातील बाळाबद्दल माझे नाव घ्यायचे नाही असे म्हणून महेश पवार व जितेंद्र उर्फ जिच्या काळे या दोघांनी अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Manganga

सदर गुन्हाची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.