Latest Marathi News

BREAKING NEWS

“फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत फडणवीसांनी दिलेली माहिती चुकीची आहे”: आदित्य ठाकरे !

0 126

मुंबई : फॉक्सकॉन आमच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेला नाही, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याबाहेर गेल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.यावर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी या आरोपांना उत्तर दिले.

 

Jawale Jewellers

ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांना जी माहिती दिली गेली ती चुकीची होती. फॉक्सकॉन कंपनी एक असली तरी वेदांता फॉक्सकॉन हा वेगळा प्रकल्प होता. देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केलेला प्रकल्प जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे. हा प्रकल्पाबाबत 2016 साली देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ योजनेतून महाराष्ट्रात आला होता. ही फॉक्सकॉनची कंपनी असून महाराष्ट्रात मोबाइल निर्मिती करणार होती. राज्यातून आता बाहेर गेलेला प्रकल्प हा सेमिकंडक्टरचा आहे, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.