Latest Marathi News

BREAKING NEWS

“टाटांच्या त्या अधिकाऱ्यांचे नाव जाहीर करा”: ‘यांचे’ फडणवीसाना आव्हान!

0 204

मुंबई : राज्यात येणारे सर्व औद्योगिक प्रकल्प हे शिंदे-फडणवीस सरकारमुळे गुजरात आणि इतर राज्यात जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. विरोधकांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रांसह उत्तर दिले. पण त्यांच्या या पत्रकार परिषदेला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

Jawale Jewellers

आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचं हक्काचं इतर राज्यांना का दिलं जातंय? राज्यातातील वातावरण हे टाटा एअरबस प्रकल्पासाठी पोषक नाही हे कोणत्या टाटाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं? त्यांनी टाटांच्या त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगावं, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना दिले. तसेच मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर येऊन बोलावे, असे देखील ते म्हणाले.

Manganga

 

दरम्यान, फडणवीस यांनी टाटा एअरबस प्रकल्पाबाबत बोलताना अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता. राज्यातील वातावरण प्रकल्पासाठी पोषक नसल्याचे अधिकारी म्हणाल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आदित्य ठाकरेंनी त्यांना थेट आव्हानच दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.