Latest Marathi News

BREAKING NEWS

“देवेंद्र फडणवीस यांना अडचण नाही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना….”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!

0 365

चंद्रपूरः राज्यातून एकानंतर एक प्रकल्प बाहेर जात आहेत. यामुळे देवेंद्र फडणवीस यांची फार अडचण होणार नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तोंड द्यावं लागणार आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

 

Jawale Jewellers

आंबेडकर म्हणाले, वेदांता प्रकल्पानंतर दोन प्रकल्प तर राज्याच्या हातून गेले. आता तिसराही पेट्रो केमिकल्सचा प्रकल्प कर्नाटकात जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे असे प्रकल्प बाहेर जाताना, एकनाथ शिंदे अडचणीत आहे, असे मी मानतो, असे वक्तव्य त्यांनी केले.

Manganga

 

तसेच ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. मोदी यांनी एखादं स्टेटमेंट वाचण्यापलिकडे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत, अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी वक्तव्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.