मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेआणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. किरीट सोमय्या यांच्याकडून पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या संदर्भात त्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.
किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर यांचे काल ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आपल्यावर होणाऱ्या आरोपांमुळे वयस्क विजया पेडणेकर यांनी धसका घेतला आणि त्यांचा मृत्यू झाला, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भेटीआधी किशोरी पेडणेकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतली आहे. या भेटीला उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.