मुंबई:मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.
सोनाली अनेक दिवसांपासून यकृताच्या समस्येने त्रस्त होत्या. सोनाली यांचे काम प्रामुख्याने बंगाली मनोरंजन विश्वात होते. आज म्हणजेच सोमवारी सकाळी कोलकाता येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
दरम्यान, सोनाली यांनी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले. २००२ साली आलेल्या ‘हार जीत’ या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. याशिवाय ‘बंधन’ या सिनेमातील त्यांची भूमिकाही गाजली होती.