बुलढाणा : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात राज्याात जात आहेत. याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच ताबडतोब राज्य सरकारने हस्तक्षेप करत गेल्या काही महिन्यामध्ये राज्याबाहेर गेलेले प्रकल्प राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत; अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या ४ महिन्यामध्ये अनेक मोठे प्रकल्प आपल्या राज्यातून निघुन जात असल्याने निदर्शनास येते. यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे वेदांता फॉक्सकॉन आहे. ज्या प्रकल्पामध्ये लाखो बेरोजगारांना रोजगाराची संधी होउ शकली असती. तो प्रकल्प मंजुर होउन त्यासाठी जागा सुध्दा निश्चीत झाली होती. तो प्रकल्प अचानक गुजरातला जाणे महाराष्ट्रातील युवकांसाठी क्लेषदायक आहे.