Latest Marathi News

मोठी बातमी: महाराष्ट्रात ५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी; ५ हजार रोजगाराऱ्या संधी होणार निर्माण!

0 305

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तब्बल ५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी दिल्याचे ट्विट केले आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ५ हजार रोजगाराऱ्या संधी निर्माण होतील, असा दावाही फडणवीसांनी केला आहे.

 

‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रोजेक्ट नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत असणार आहे’, असे फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Manganga

 

दरम्यान, रांजणगावमध्ये होणाऱ्या या नव्या प्रकल्पामुळे राज्यातील ५ हजार युवकांना नोकरीची संधी निर्माण करेल. या प्रकल्पाचे लक्ष्य २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे असेल, तर हा प्रकल्प पुढील ३२ महिन्यात कार्यान्वित होणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!