Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आईच्या डोळ्यांदेखत मुलाने खोल दरीत उडी घेत केले धक्कादायक कृत्य!

0 459

बीड : बीडच्या अंबाजोगाई शहरात आईच्या डोळ्यासमोरच जवळपास 250 फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दिनेश रमेश लोमटे (वय 20 रा. कोष्टी गल्ली अंबाजोगाई) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, मयत दिनेश लोमटे हा पहाटेच्या सुमारास आत्महत्या करण्याच्या उद्देशाने घरातून मुकुंदराज परिसराकडे धावत सुटला होता. त्याला रोखण्यासाठी आईही विनवणी करत मागे धावत होती. पण दिनेशवर काहीही परिणाम झाला नाही. तो धावतच होता. पुढे मॉर्निंग वॉकसाठी आलेले पत्रकार दत्ता आंबेकर, अशोक दळवे, बालाजी खैरमोडे, मारुती जोगदंड यांनी हा प्रकार पाहून दिनेशला थांबवून समजूत काढून शांत केले. आईजवळ आल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करून पत्रकार बंधु पुढे गेले. अन् मागे त्याने पुन्हा पळत जाऊन अंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसरातील व्ह्यू पॉइंटवरुन जवळपास 250 फूट खोल दरीत आईच्या डोळ्यांदेखत उडी घेतली. यांनतर दरीत उतरून पाहिले तोपर्यंत दिनेशचा मृत्यू झाला होता.

 

दरम्यान, घटनेची माहिती अंबाजोगाई पोलीसांना देण्यात आली. मात्र दिनेशने आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.