मुंबई: रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर माझे शब्द मागे घेऊन विषय संपवतो, असे म्हटले आहे. त्यामुळे रवी राणा यांच्या दिलगिरीनंतर कॉग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक सूचक ट्विट करत वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
‘रवी राणांनी बच्चू कडूंवरील आरोपानंतरच्या वादावर एकतर्फी पध्दतीने पडदा टाकता येणार नाही. रवी राणांचा खोक्यांचा आरोप केवळ बच्चू कडूंवर नाही तर मविआ सरकार पाडण्यासाठी पार पडलेल्या सगळ्या प्रक्रियेवर आरोप केला आहे. खोके देण्याचा आरोप हा ‘महाशक्ती’ वर जातो. याची चौकशी होणे गरजेचे आहे’, असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, कॉग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक सूचक ट्विट करत वेगळीच शंका उपस्थित केली आहे.