औरंगाबाद: औरंगाबाद शहरात पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने मित्राच्या सहाय्याने खून केला. विजय पाटणी असे मृताचे नाव असून, मृताची पत्नी सारिका व सागर अशी आरोपींची नावे आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, बारा वर्षांपूर्वी सारिका आणि विजयने प्रेम विवाह केला होता. कौटुंबिक वादामुळे पती, पत्नी विभक्त राहू लागले खरे, मात्र, तरीही पती त्रास देत होता. मागील काही दिवसांपासून विजय हा पत्नीकडे सतत दारू पिऊन त्रास देत होता.या त्रासाला कंटाळून पत्नीने पतीला संपवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी सागरची मदत घेतली. खून केल्यानंतर दहा दिवसांनी हा प्रकार समोर आला.
दत्म्यान, याप्रकरणी सातारा पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून पत्नीसह प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.