सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात उसाने भरलेली ट्रॉली घेऊन जात असताना ट्रॉली महिलेच्या अंगावर उलटल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अक्कलकोट तालुक्यातील मनगोळीतील महिलेचा मृत्यू झाला आहे. कमल गेजगे असे मृत महिलेचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, कमल या रस्त्याच्या कडेने चालत जाताना त्यांच्या अंगावर उसाने भरलेली ट्रॉली पडली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांना लगेच खासगी वाहनाने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.