Latest Marathi News

BREAKING NEWS

“…तर मी माझे शब्द मागे घेतो आणि याठिकाणी हा विषय संपवतो”: आमदार रवी राणा!

0 226

मुंबई: शिंदे-ठाकरे सरकारला पाठिंबा देणारे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातला वाद आता मिटण्याची शक्यता आहे. आमदार रवी राणा यांनी आज, सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, या भेटीनंतर राणा माध्यमांसमोर आले या भेटीनंतर बच्चू कडू यांची माफी मागितली.

 

Jawale Jewellers

पत्रकारांशी संवाद साधताना आमदार रवी राणा म्हणाले की, मला असं वाटतंय आमच्या वादामुळे कुणाचं मन दुखावलं असेल आणि गैरसमज झाला असेल तर मी माझे शब्द मागे घेतो आणि याठिकाणी हा विषय संपवतो आहे. मला अपेक्षा आहे की, आमदार बच्चू कडूसुद्धा आपले अपशब्द मागे घेतील. माझ्या शब्दांमुळे कुणी आमदार दुखावले असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केले.

Manganga

 

दरम्यान, आमदार रवी राणा यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्याच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर भेट घेतली. या फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणा माध्यमांसमोर आले आणि त्यानी बिनशर्तपणे आमदार बच्चू कडू यांची माफी मागितली.

Leave A Reply

Your email address will not be published.