Latest Marathi News

BREAKING NEWS

बच्चू कडू-रवी राणांमधील मिटला वाद? वर्षा बंगल्यावर झाली मोठी चर्चा!

0 214

मुंबई: राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या काही दिवासांपासून वाद सुरू आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत दोघांनाही वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी बोलावले होते.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी दोघांनाही रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी बोलावले. शिंदेंनी रविवारी रात्री दोघांसोबतही तब्बल अडीच तास चर्चा केली. पण त्यामध्ये कोणताच ठोस निर्णय झाला  नसून वाद कायम असल्याची माहिती आहे.

Manganga

 

दरम्यान, आज रवी राणा आणि बच्चू कडू हे ‘सागर’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.