Latest Marathi News

BREAKING NEWS

WiFi चा पासवर्ड दिला नाही म्हणून दोघांनी अल्पवयीन मुलाची……!

0 273

नवी मुंबई: नवी मुंबईतील कामोठे परिसरात इंटरनेट वापरण्यासाठी वायफायचा पासवर्ड न दिल्याने दोन तरुणांची एका अल्पवयीन मुलाची भररस्त्यात हत्या केली.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, आरोपी हे नवी मुंबईतील कामोठे येथील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आरोपी रवींद्र अटवाल आणि राज वाल्मिकी हे दोघेही सफाई कामगार म्हणून काम करतात. तर मृत झालेला अल्पवयीन विशाल मौर्य हा बेकरी मध्ये काम करतो.या दोघांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला इंटरनेट वापरण्यासाठी वायफायचा पासवर्ड विचारला, मात्र त्या मुलाने पासवर्ड शेअर करण्यास नकार दिला. विशाल मोर्यने आपला इंटरनेट पासवर्ड देण्यास नकार दिल्याच्या रागातून रवींद्र आणि राज यांनी विशालला भररस्त्यात गाठत त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला.या हल्ल्यात विशालचा मृत्यू झाला.

Manganga

 

दरम्यान, कामोठे पोलिसांनी दोन्हीही आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या गंभीर प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.