Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, रविवार ३० ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 659

मेष:
जनसंपर्कात भर पडेल. तडकाफडकी निर्णय बदलू नका. जोडीदाराची साथ मिळेल. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल.

 

Jawale Jewellers

वृषभ:
जुनी कामे पूर्ण करता येतील. मुलांकडून अपेक्षा पूर्ण केल्या जातील. प्रवासात काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल.

Manganga

 

मिथुन:
मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. स्वप्नवत वातावरणात रमून जाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे.

 

कर्क:
मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. उगाच चिडचिड करू नका. आवडीवर खर्च कराल. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका.

 

सिंह:
मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका. आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. मानसिक आंदोलन ओळखून वागावे. नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस.

 

कन्या:
कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल. आवडीच्या गोष्टी करता येतील. दिवस चांगला जाईल.

 

तूळ:
आपले स्वत्व राखून वागाल. जवळची व्यक्ति भेटेल. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. दिवस कामात व्यस्त राहील. बोलताना भान राखावे.

 

वृश्चिक:
संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. कौटुंबिक समाधान शोधाल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी.

 

धनू:
अचानक धनलाभ संभवतो. ज्ञानात भर पडेल. आर्थिक बाजू सुधारेल. छानछोकीसाठी खर्च कराल. दान-धर्म कराल.

 

मकर:
भागीदाराची बाजू विचारात घ्या. जुनी येणी वसूल होतील. अनावश्यक खर्च संभवतो. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.

 

कुंभ:
घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. लहान प्रवास संभवतो. जोडीदाराला खुश करावे लागेल.

 

मीन:
जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. व्यवसायात प्रगती करता येईल. मुलांशी मतभेद संभवतात. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.