Latest Marathi News

BREAKING NEWS

“शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही, माजलेल्या बोक्यांना घरी बसवले”: ‘यांचा’ उद्धव ठाकरे  यांच्यावर हल्लाबोल!

0 401

 

Jawale Jewellers

नंदूरबार: विकास कामाच्या मुद्द्यावरून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे  यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदूरबारच्या दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी विविध कामांचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.

 

 

Manganga

पाटील म्हणाले, “आमच्यावर तुम्ही आरोप करता. 35 वर्ष आयुष्य शिवसेनेत घातलं. या नंदूरबारपर्यंत आलेला हा गुलाबराव पाटील आहे. धुळ्यात शाखा निर्माण करणारा हा गुलाबराव पाटील आहे. मर्दांची संघटना सांगणारा हा गुलाबराव आहे. खेड्यापाड्यात आम्ही शिवसेना उभी केली. पण मुंबईतील चापलूस सांगतात शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली. शिवसेनेशी आम्ही गद्दारी केली नाही. शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. माजलेल्या बोक्यांना घरी बसवले, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.