Latest Marathi News

BREAKING NEWS

महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागासाठी तब्बल 11 हजार 199 कोटींचा निधी मिळणार!

0 112

नंदुरबार : राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असून त्यांच्या उन्नतीकरिता आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटींची तरतूद सन 2022-2023 मध्ये केली आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नंदुरबार येथे केले.

 

Jawale Jewellers

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीरात शिंदे बोलत होते.नंदुरबार नगर परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कृषि मंत्री अब्दुल सत्तार,बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भूसे,खासदार डॉ.हिना गावीत,खासदार राजेंद्र गावीत,आमदार किशोर दराडे,आमदार किशोर पाटील,आमदार मंजुळाताई गावीत,आमदार राजेश पाडवी,आमदार शिरीष नाईक,आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.