Latest Marathi News

BREAKING NEWS

सोशल मीडियावरील खोट्या मजकूराबाबत यूजर्स केंद्र सरकारकडे तक्रार करू शकणार: केंद्र सरकार!

0 134

नवी दिल्ली : सोशल मीडियावरील खोट्या मजकूराबाबत ट्वीटर, फेसबूक, इस्टाग्राम या सारख्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म्सचे यूजर्स केंद्र सरकारकडे तक्रार करू शकणार आहे. या संदर्भात सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकार येत्या 3 महिन्यात या संदर्भात एक समिती स्थापन करणार आहे.

 

Jawale Jewellers

या समितीत तीन सदस्य असतील.यातील एक सदस्य अध्यक्ष म्हणून काम करेल. तसेच, तक्रार निवारण समितीकडे तक्रार केल्यानंतर तक्रारीचे निरसन न झाल्यास 30 दिवसानंतर युजर या समितीकडे तक्रार करू शकतो.

Manganga

 

कंपनीकडे मजकूर संदर्भात तक्रार आल्यास 72 तासात कारवाई करणं बंधनकारक आहे, सोशल मीडिया कंपनीला सेंसटीव्ह कंटेन 24 तासाच्या आत हटवावा लागणार. इतर तक्रारी 15 दिवसात सोडवणे बंधनकारक आहे. सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर युजरला 22 भारतीय भाषेत नियम, गोपनियतेची माहिती देणं बंधनकारक असेल, या भाषेत मराठी भाषेचा ही समावेश असणा, या मजकूरावर कंपनीला कारवाई करावी लागणार.

 

तसेच, अश्लील, अपमानजनक, बालशोषण, जातीवाचक, वैयक्तिक स्वातंत्र्यांचं उल्लंघन करणारा, धार्मिक उन्माद वाढवणारा मजकूर प्रसिद्ध करण्यास मनाई आहे याशिवाय, कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारा मजकूर, भारताच्या एकतेला, सुरक्षेला, अखंडतेला, संप्रभूतेला नुकसान पोहोचेल असा मजकूर, या मजकूरावर कंपनीला कारवाई करावी लागणार.

 

Leave A Reply

Your email address will not be published.