जळगाव: मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. चिमणराव पाटील यांनी टीका केल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या टीकेचा समाचार घेतला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, “एकमेकांबरोबर नारळ फोडल्याने जर पक्षाला बळ मिळत असेल तर पारोळा मार्केट कमिटीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उमेदवारांना चिमणराव पाटील बिनविरोध निवडून आणतात. राष्ट्रवादीशी आय लव यू करतात. तेव्हा त्यांचं बळ कुठे जातं?”, असा जोरदार पलटवार गुलाबराव पाटील यांनी चिमणराव पाटलांवर केला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “राष्ट्रवादीला बळ दिलं जात असल्याच्या आरोपावरून शिवसेनेत बंड केलं. आता आपले मंत्री राष्ट्रवादीला बळ कसे देतात? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच तुम्ही मंत्री झालात. सरकार तुमची खासगी मालमत्ता नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.