“…ते भाजपच्या वाॅशिंग मशिन मध्ये गेले हा बेगडीपणा मला कधीही जमलेला नाही”: किशोरी पेडणेकर यांचा भाजपवर हल्लाबोल!
मुंबई – माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

पेडणेकर म्हणाल्या, “SRA घोटाळा प्रकरणामध्ये कोर्टाने स्पष्टपणे लिहून दिले आहे की माझा त्यात समावेश नाही. यामध्ये ते स्वत: किशोरी पेडणेकर यांचा एसआरएने स्पष्ट केले आहे. दरवेळी किरीट सोमय्या प्रत्येकाला पिंजऱ्यात उभे करतात. एसआरएने कळवलं आहे की किशोरी पेडणेकर यांचा संबंध नाही. त्यामुळे मी तुमच्या दबावाला बळी पडणार नाही, मी बोलणारच, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी भाजपला इशारा दिला.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते वारंवार दबाव तत्रांचा वापर सुरू आहे. वार करून विरोधातील नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यांना जेरीस आणले ते भाजपच्या वाॅशिंग मशिन मध्ये गेले हा बेगडीपणा मला कधीही जमलेला नाही, असेही पेडणेकर यांनी वक्तव्य केले.