Latest Marathi News

BREAKING NEWS

….म्हणून कोर्टाच्या परिसरातच महिला वकिलांमध्ये झिंज्या उपटत हाणामारी!

0 562

मुंबई: सोशल मीडियावर दररोज व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसेच, सर्वसामान्यांमध्ये वाद किंवा हाणामारी झाली तर प्रकरण कोर्टामध्ये जातं. परंतु, सध्या सोशल मीडियावर दोन महिला वकिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यामध्ये कोर्ट परिसरातच दोन महिला वकीलच एकमेकींना तुफान मारहाण करताना दिसून येत आहे.

 

Jawale Jewellers

व्हायरल झालेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील आहे. येथील कासगंज जिल्हा सत्र न्यायालयाच्या फॅमिली कोर्टाबाहेर ही हाणामारी झाली. दोन्ही महिला वकील आपाआपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी कोर्टात आल्या होत्या. त्यावेळी काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली.

Manganga

 

तसेच, व्हायरल व्हिडिओमध्ये, दोन महिला वकिलाच्या ड्रेसमध्ये आहेत. त्या एकमेकींच्या सटासट लाथा बुक्क्यांनी मारहाण करता आहेत. तसेच एकमेकींच्या झिंज्या देखील उपटत आहेत. या महिलांना भांडताना बघून तेथे उपस्थित असलेले इतर वकील त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. मात्र, तरी सुद्धा या दोन्ही महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. दोघींपैकी एकही मागे हटायला तयार नाही. कुणी मध्यस्थी केली की थोडा वेळ शांत बसतात पण लगेच एकमेकींवर तुटून पडतात. आजूबाजूच्या लोकांनासुद्धा या महिलांना आवरणे अवघड झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.