मुंबई : एसआरए गाळ्यांवर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यांची कालही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलणवण्यात आलं होतं. दरम्यान, ज्या एसआरए गाळ्यावरुन त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते, तिथे त्या आज सकाळी दाखल झाले होते.
यावेळी, मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. शिवाय दादर पोलीस स्थानकात चौकशीला मी जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे दबावतंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. कसंही करुन मला अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी यावेळी म्हटले आहे.
तसेच, दरवेळी प्रत्येक गोष्टीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.