Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शनिवार २९ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 654

मेष:
आर्थिक घडी सुधारेल. भाग्याची साथ लाभेल. व्यावसायिक स्तरावर एखादी चांगली घटना घडेल. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. एखादी दिलासादायक घटना घडेल.

 

Jawale Jewellers

वृषभ:
तब्येतीला जपा. जवळचे मित्र भेटतील. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका.

Manganga

 

मिथुन:
प्रगतीला चांगला वाव मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विक्षिप्त लोकांपासून दूर रहा. वेळेबरोबर चालावे लागेल. मनासारखी घटना घडेल.

 

कर्क:
आपल्याच विचारात मग्न राहाल. आवश्यक तेथेच पुढारीपणा स्वीकारावा. करियर विषयी चिंता वाटू लागेल. गणेशाची आराधना करावी. हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा.

 

सिंह:
कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत. मुलांकडून चांगली बातमी समजेल. प्रयत्नांची कास सोडू नये. हवी असलेली उत्तरे मिळतील. व्यवसायिकांनी सतर्क राहावे.

 

कन्या:
कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. मात्र धावपळ लाभदायक ठरेल. जोडीदाराशी मतभेद टाळा. धावपळीचा दिवस.

 

तूळ:
आपल्याच मुद्यावर अडून राहाल. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे. मानसिक दुर्बलता टाळावी. मनातील संभ्रम दूर सारावा. उगाचच एखादी चिंता सातवेल.

 

वृश्चिक:
बौद्धिक ताण जाणवेल. गरज नसेल तर फार बोलू नका. उगाच लपवा छपवी करू नका. सामाजिक कामात मदत नोंदवाल. कर्तुत्वाला वाव मिळेल.

 

धनू:
कौटुंबिक जबाबदार्‍या चिकाटीने पार पाडाव्यात. धार्मिक कामासाठी खर्च कराल. जुनी येणी प्राप्त होतील. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात.

 

मकर:
मित्रांसोबत वेळ घालवाल. कामावर अधिक निष्ठा ठेवावी. जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल.

 

कुंभ:
आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. समोरील संधीचा लाभ घ्यावा. वेळेचा सदुपयोग करावा. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेऊ नका. अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल.

 

मीन:
वादाच्या मुद्यात अडकू नका. अनावश्यक खरेदी केली जाईल. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे. आहारात अति तिखट पदार्थ टाळावेत. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.