Latest Marathi News

BREAKING NEWS

मुंबई पोलिसांकडून किशोरी पेडणेकरांची ‘या’ प्रकरणी कसून चौकशी!

0 359

 

Jawale Jewellers

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची आज मुंबईच्या दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर SRA अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांची आज चौकशी झाली. तसेच, पोलिसांनी पेडणेकरांना उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.

 

Manganga

दरम्यान, मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी SRA प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी काही लोकांना अटक देखील करण्यात आली होती. पण या प्रकरणात कुठेही किशोरी पेडणेकरांचं नाव जोडलं गेलं नव्हतं. मात्र आज पहिल्यांदाच किशोर पेडणेकर यांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी त्यांना उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.