Latest Marathi News

BREAKING NEWS

“शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून राज्य सरकारला निवेदन दिले होते मात्र…….”: अजित पवार!

0 194

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता राज्यात ओला दुष्कार जाहीर करण्याची मागणी केली आहे.

 

Jawale Jewellers

पवार म्हणाले, “दिवाळी साजरी करत असताना वेदना होत होत्या. कारण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. अनेक शेतकरी टोकाचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी दिवाळी आधीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते, मात्र खरीबाचं पिक गेलं त्यांनतर रबीचं पिक गेल्याने शेतकरी पुरता भरडला गेला आहे. ग्रामीण भागात शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. सोयाबिय, कापूस अशी पिकं उद्ध्वस्त झाली आहे. शेतीच्या नुकसानीचे अद्याच पंचनामे झाले नाही, असे अजित पवार यांनी वक्तव्य केले.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.