Latest Marathi News

BREAKING NEWS

“…..पण आता मोदी जे करत आहेत, ते दुर्भाग्यपूर्ण”: पृथ्वीराज चव्हाण!

0 197

मुंबई: राज्यातून वेदांता-फॉक्सफॉनपाठोपाठ आता टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे एअरबस प्रकल्पावरून विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच आत या एअरबस प्रकल्पावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Jawale Jewellers

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,’गेल्या अनेक वर्षात राज्यात मोठा प्रकल्प नाही. हे दुर्दैव आहे. एअरबसबाबत प्रकल्प गुजरातला जाणार हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत कोणत्याच पंतप्रधान यांनी आपलं राज्य, आपलं शहर असा दुराग्रह केला नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान असतात. पण आता मोदी जे करत आहेत. ते दुर्भाग्यपूर्ण आहे’.

Manganga

 

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्तक्षेप हा तीव्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राची राज्याची बाजू लंगडी पडत आहे. प्रकल्प देशात येतोय, याचं स्वागत केलं पाहिजे. पण यात पंतप्रधान किंवा जवळच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांनी एका राज्याच्या विरोधात हस्तक्षेप करण उचित नाही. याबाबत सर्वपक्षीय बैठक घ्यावी, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.