उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका लग्नसोहळ्यात रसगुल्ला न मिळाल्यावरून वर आणि वधूपक्षाकडील लोक परस्परांशी भिडले. त्यानंतर चाकूने वार करण्यात आले. यात जखमी होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला.

माहितीनुसार, आग्राच्या एत्मादपूर परिसरात खंदौलीचा व्यापारी वकारच्या दोन्ही मुलांचे बुधवारी लग्न होते. लग्नाच्या आदल्या रात्री जेवण सुरू असताना पाहुण्यांमध्ये रसगुल्ल्यावरून वाद झाला. वरात पोहोचल्यानंतर वधूपक्षाकडील मंडळींनी वऱ्हाड्यांचे स्वागत केले. वरात पोहोचल्यानंतर तिथे रसगुल्ले दिले जात होते. एका वऱ्हाड्याने एकापेक्षा जास्त रसगुल्ल्यांची मागणी केली. त्यावर काउंटरवर उभ्या असलेल्या तरुणाने ते देण्यास नकार दिला. यावरून वाद झाला. त्यानंतर एकमेकांवर चाकूने वार करण्यात आले. यात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.