जळगाव : आमदार शहाजी बापूंनी आपली पूर्वीची स्थिती सांगितली. शरद पवारांनी आपल्याकडे लक्ष दिले नाही. त्यावेळी बायकोला साडी घेण्यासाठीही आपल्याकडे पैसे नव्हते. असे विधान शहाजी बापू पाटील यांनी केले होते. त्यावरून आमदार एकनाथ खडसेंनी शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावर खडसे म्हणाले, “कदाचित ते गंमतीने केले असेल किंवा उद्वेगातून केले असेल. पण आपल्या बायकोलाही साडी घेऊ शकत नसेल तर तो मर्द कसला? असा टोला खडसेंनी लगावला.

तसेच ते पुढे म्हणाले, “शहाजी बापू पाटील यांनी जे म्हटले आहे, ते कोणत्या हेतूने म्हटले ते मला माहिती नाही. परंतु शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यापासून सुधारली. त्यामुळे आता त्यांना कोणाकडे आशेने बघण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी वक्तव्य केले.