बीड: बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांना बैठकीदरम्यान चहा पिता का आणि त्यानंतर दारू पिता का असे विचारणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे. तसेच, मंत्री सत्तार यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना छोटा पप्पू असे संबोधिले आहे.
माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केल्याचे माध्यमांनी लक्ष वेधले. त्यावर सत्तार यांनी कोण तो छोटा पप्पू असे म्हटलं. सत्तार म्हणाले छाेटा पप्पू काही ही बाेलू शकताे. आम्ही शेतक-यांसाठी कार्य करीत आहोत. अऩेक वर्ष मी शेतक-यांसाठी काम करीत आहे.

हे गोधडीत असताना आम्ही शेतक-यांच्या बांधावर पोहचलो. शेतक-यांना मदत व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. गाेधडीतून बाहेर आलेले आता बाेलू लागले आहेत. लाेकांमध्ये संभ्रम निर्माण करताहेत असे सत्तारांनी नमूद केले.