औरंगाबाद : औरंगाबाद शहरात जादूटोणा करत आपल्या धंद्यामध्ये नुकसान घडवून आणल्याच्या मानसिकतेमधून हा खून झाल्याची घटना घडली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मयत कारभारी शेंबडे हा आरोपी सद्दाम सय्यद सिराज सय्यद याच्या सासरवाडीचा असल्याने दोघांची ओळख होती. आरोपी सय्यद याचे कमळापूर येथे फर्निचरचे दुकान आहे. मयत शेंबडे याने जादूटोणा करून आणि जडीबुटी वापरून धंद्यामध्ये नुकसान केले असल्याचा राग मनात धरून आरोपी सय्यदने मयत शेंबडे यांना शहरातील मिटमिटा परिसरात माझ्या परिचयातील महिलेला मूलबाळ होत नाही तू काही जडीबुटी दे असे सांगून बोलावून घेतले. मयत शेंबडेसोबत आलेल्या दोघांना माघारी पाठवत मयत शेंबडे आणि आरोपी सय्यद सोबत दारू प्यायले, त्यानंतर एका हार्डवेअर वरून फावड्याचा लाकडी दांडा घेऊन रेल्वे पटरीच्या बाजूला शेंबडे यांच्या डोक्यात मारून त्याचा खून केला.

दरम्यान, खून केल्याची कबुली आरोपीने एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.