मुंबई : राज्यात सत्तासंघर्षानंतर भाजप आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला असल्याची माहिती समोर येत आहे.
कटुता संपवा असे आवाहन ठाकरे गटाकडून फडणवीस यांना करण्यात आले आहे. काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत.
नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!! असे आवाहन सामना अग्रलेखातून फडणवीस यांना करण्यात आले आहे.

दरम्यान, आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून फडणवीस यांना साद घातल्याने पुन्हा नव्याने युती होणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.