सांगोला तालुक्यासाठी समन्यायी पाणी वाटपासाठी आर्थिक नियोजन झाले पाहिजे : गणेश बाबर
बंदिस्त पाणी पाईपलाईन ने मिळणारे पाणी शेतकऱ्यांच्या साठी मोठी उपलब्धता आहे.
आटपाडी : सांगोला तालुक्यासाठी समन्यायी पाणी वाटपासाठी आर्थिक नियोजन झाले पाहिजे अशी मागणी श्रमिक मुक्ती दल सांगोल्याचे प्रमुख गणेश बाबर यांनी व्यक्त केले. ते आटपाडी येथील “शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा” मध्ये बोलत होते. यावेळी कार्यक्रमास माजी मंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आम. जयंत पाटील, डॉ. भारत पाटणकर, आनंदराव पाटील, सोपेकॉपचे जे.के. रॉय, किरण लोहकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, बंदिस्त पाणी पाईपलाईन ने मिळणारे पाणी शेतकऱ्यांच्या साठी मोठी उपलब्धता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवकालीन पाणी पुरवठा योजना आजही दिशा दर्शक आहे. एकात्मिक पाणी विकास झाला पाहिजे, त्यासाठी नदी जोड प्रकल्प आवश्यक असल्याचे डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यामुळे सध्या डॉ. भारत पाटणकर यांनी हाती घेतलेला समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा हा राज्यात नव्हे देशातील प्रमुख मुद्दा आहे.
सध्या सांगोला तालुक्यातील बुध्दीहोळ तलावाखाली १६ पाणी वापर संस्था या यशस्वी पणे वाटचाल करीत आहेत. तसेच समन्यायी पाणी वाटप करताना धरणग्रस्त याचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने सांगोला तालुक्यातील शेतकरी, महिला वर्ग उपस्थित होता.