“भांडण्यापेक्षा आजच मुख्यमंत्री पदाचे नाव देखील जाहीर करा”: भाजपच्या खासदाराचा राष्ट्रवादी कॉँग्रेसवर निशाणा!
अहमदनगर : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न 35-40 वर्षांनी पूर्ण होईल, प्रत्येक पक्षाला आत्मविश्वास असणे चांगलं आहे. मात्र मला आनंद अधिक होईल, जेव्हा की त्यांनी मुख्यमंत्री पदाचे नाव देखील जाहीर करावं. तसेच, वाय विखे यांनी, पक्षाला नेतृत्व कोण देणार ? आणि मुख्यमंत्री कोण होणार ? हे झाल्यानंतर जनतेला कळायला नको आधीच स्पष्ट करावे असे सुजय विखे म्हंटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, “तुमचा पक्ष सर्वात मोठा झाला आहे, मग भांडण्यापेक्षा आजच नाव जाहीर केलं तर जास्त आनंद होईल. जनतेला ही चित्र स्पष्ट होईल भविष्यात पक्षाचे नेतृत्व कोण करणार आहे, दिवाळीच्या सणामुळे जास्त झोप झाली आहे, त्यामुळे लोक स्वप्न बघत आहे. याशिवाय, स्वप्न पाहायला बंदी नाही, स्वप्न पहावी पण त्यांचे स्वप्न 35-40 वर्षांनी पूर्ण होईल असा टोला देखील सुजय विखे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला लगावला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवाळीनिमित्ताने अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावर पाहायची इच्छा व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे युवा खासदार सुजय विखे यांनी रोहित पवारांच्या विधानावरुन राष्ट्रवादी कॉँग्रेसवर निशाणा साधला आहे.