Latest Marathi News

BREAKING NEWS

अंत्यसंस्कारला घेऊन जाताना तरुण अचानक तिरडीवरुन उठला अन…..!

0 1,952

अकोला: अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात एक तरुण मयत झाला म्हणून त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला घेऊन जात असतानाच तो चक्क तिरडीवरून उठून बसल्याची घटना घडली आहे. प्रशांत मेसरे असे मयत झालेल्या आणि मध्येच तिरडीवर उठणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

 

Jawale Jewellers

याबद्दल अद्धिक माहिती अशी कि, प्रशांत मृत झाला असे सांगत त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी करून त्याला स्मशानभूमीत नेत असताना तरुणामध्ये हालचाल जाणवली अंत्यसंस्कार यात्रा थांबवतच हा तरुण उठून बसल्याचे समोर आले.यानंतर हा प्रकार पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना यावेळी पाचारण करण्यात आले होते.

Manganga

 

दरम्यान पोलिसानी त्या तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर त्या तरुणावर काळी जादू केल्याचे कुटुंबानी दावा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.