मुंबई : ST महामंडळाच्या ताफ्यात लवकरच चार हजार नव्या गाड्या दाखल होणार आहेत. याबाबतचा निर्णय उद्या होणाऱ्या एसटी राज्य परिवहन संचालक मंडळाच्या बैठकीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, उद्याच्या बैठकीतील प्रमुख निर्णय म्हणजे एसटी महामंडळाच्या ताफ्यात चार हजार नव्या गाड्या दाखल होणार असून या गाड्या सीएनजीऐवजी (CNG) दोन हजार डिझेल गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील. तर दोन हजार इलेक्ट्रीक गाड्या भाडे तत्वावर घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महागाई भत्ता देखील 28 टक्क्यांवरून 34 टक्के करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.