Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : कौठूळी येथे विकास कामांचे भूमिपूजन आम. पडळकर यांच्या हस्ते संपन्न

कौठूळी येथील वेताळबा मंदिर ते केंगार वस्तीकडे जाणाऱ्या रोडवरील ओढ्यावरती सीडीवर्क मंजूर करावे अशी मागणी येथील नागरिकांनी आम. गोपीचंद पडळकर यांच्याकडे केली होती.

0 497

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील कौठुळी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार फंडातून मंजूर करण्यात आलेल्या विकास कामाचे भूमिपूजन आम. गोपीचंद पडळकर यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

Jawale Jewellers

कौठूळी येथील वेताळबा मंदिर ते केंगार वस्तीकडे जाणाऱ्या रोडवरील ओढ्यावरती सीडीवर्क मंजूर करावे अशी मागणी येथील नागरिकांनी आम. गोपीचंद पडळकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांनी या कामासाठी त्यांच्या स्थानिक आमदार फंडा मधून या कामासाठी निधी दिला होता. या ओढ्यापात्रावर पूल झाल्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Manganga

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी उपसभापती रुपेशकुमार पाटील, माजी जि.प, सदस्य अरुण बालटे यांच्यासह युवा नेते अनिल पाटील, आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, जेष्ठ नेते श्रीरंग कदम, उपसरपंच नवनाथ कदम, अनिल सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.