Latest Marathi News

BREAKING NEWS

श्रीमंत बाबासाहेब देशमुख दुघ संघाच्या चौथ्या युनिटचा होणार शुभारंभ

दुघ संघाच्या चौथ्या युनिटच्या चिलिंग सेंटर व दुध संकलन केंद्राचा शुभारंभ शुक्रवार दि. २८ रोजी सकाळी १०.०० गोपाळपूर-मुंढेवाडी रोड येथे संपन्न होणार आहे.

0 1,308

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील श्रीमंत बाबासाहेब देशमुख दुघ संघाच्या चौथ्या युनिटच्या चिलिंग सेंटर व दुध संकलन केंद्राचा शुभारंभ शुक्रवार दि. २८ रोजी सकाळी १०.०० गोपाळपूर-मुंढेवाडी रोड येथे संपन्न होणार आहे.

Jawale Jewellers

आटपाडी तालुक्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या सोय व्हावी या हेतूने सन २००७ साली श्रीमंत बाबासाहेब देशमुख मिल्क प्रोड्युसर कंपनीची स्थापना सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आटपाडी येथे केली. त्यानंतर दुध संघाने खानापूर मतदार संघातील विटा येथे सन २०१२ साली दुसरे युनिट सुरु केले. तर सन २०१७ साली जत या दुष्काळी तालुक्यामध्ये तिसऱ्या युनिटचा शुभारंभ केला होता.

Manganga

तीनही युनिटचे दुध संकलनाचे काम मोठ्या प्रमाणावर होत असल्याने चौथ्या युनिटच्या चिलिंग सेंटर व दुध संकलन केंद्राचा शुभारंभ शुक्रवार दि. २८ रोजी सकाळी १०.०० गोपाळपूर-मुंढेवाडी रोड येथे संपन्न होणार आहे. तरी पंढरपूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन दूध संघाचे संस्थापक चेअरमन, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जनरल मॅनेजर अशोक दौंड, दूध संघाचे डायरेक्ट दिग्विजय देशमुख यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.