Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : किल्ला बांधणे स्पर्धेचा दिमाखदार बक्षीस सोहळा संपन्न

डेस्टिनी फाउंडेशन व रमाकांत भाऊ सोहनी युवामंच गोमेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

0 1,050

आटपाडी : डेस्टिनी फाउंडेशन व रमाकांत भाऊ सोहनी युवामंच गोमेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

Jawale Jewellers

या स्पर्धेमध्ये गोमेवाडी, करगणी, काळेवाडी, हिवतड, अर्जुनवाडी या गावातून 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामधून मोठा व लहान असे दोन गटात बक्षिसे देण्यात आली. मोठ्या गटात पहिला प्रथमेश जाधव, दुसरा निहाल बनसोडे, तिसरा ऋषिकेश शिंदे, चौथा आरती काळे, पाचवा अर्जुन आवळे तर लहान गटात पहिला राजवर्धन सरगर, दुसरा सोहम माळी, तिसरा ऋषिकेश सस्ते, चौथा सेजल कुलकर्णी, पाचवा यश सोहनी असे विजेते झाले. त्यांना रोख 22 हजार बक्षिसे, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व लेखणी देण्यात आली.

Manganga

यासाठी भाऊसो शिंदे, रामहरी कदम, संतोष सरगर, रविंद्र सरगर लक्ष्मण कदम, नाथबाबा सरगर, प्रविण देवकुळे, उत्तम कदम, दिपक मोटे, संतोष काळे, अमोल जावीर, मुन्ना मुलाणी, विजय भोसले, मनोहर जावीर, तातोबा जावीर, आप्पा लवटे, दिनकर जावीर यांनी सहकार्य केले आहे. यावेळी अनेकांनी मनोगते व्यक्त करताना युवामंच आयोजित करत असणारे सर्व कार्यक्रम तसेच फाउंडेशन व गोमेवाडी गावकरी यांचे सहकार्य हे असेच सुरू राहावेत असे मनोगत व्यक्त केले. वस्ताद रोहित देवकुळे यांनी महाराष्ट्र दांडपट्टा क्लबच्या मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादरीकरण व्हीडिओच्या माध्यमातून केले.

यावेळी कल्याण गुरुजी, सुधीर इनामदार, सुनील दबडे, श्रीकृष्ण पडळकर, लक्ष्मण सरगर, उमाजी सरगर, बट्टू मुलाणी, सतीश सोहनी, गिरीश झेंडे, नवल जावीर, सुभाष व्हनमाने, सोमनाथ झेंडे, विजय कोरे, रोहित सोहनी, समाधान सोहनी, दिपक देवकुळे, संतोष जावीर, यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.