T20 World Cup : इंग्लंडला धक्का ! डकवर्थ लुईस नियमानुसार झाला पराभव
पावसाच्या व्यत्ययामुळे आयर्लंडने डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेलेल्या T20 World Cup मधील इंग्लंड आणि आयर्लंड सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे आयर्लंडने सामना पाच धावांनी जिंकला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १४.३ षटकांत ५ बाद १०५ धावांवर खेळत असताना मध्येच पावसाने व्यत्यय आणला आणि त्यामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे इंग्लंड पाच धावांनी मागे राहिला.
इंग्लडची सुरुवात खराब झाली. कर्णधार जोस बटलर (००) हा डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पाठोपाठ आणि अॅगलेक्स हेल्स (०७) बाद झाले. जोशुआ लिटलने दोघांनाही बाद केले. तर बेन स्टोक्स (०६) त्रिफळाचीत झाला. हॅरी ब्रूक जॉर्ज डॉकरेलचा बळी ठरला. डेव्हिड मलान ३७ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला. मोईन अली १२ चेंडूत २४ धावा करून नाबाद राहिला. लियाम लिव्हिंगस्टोन दोन चेंडूत एका धावेवर नाबाद राहिला.
प्रथम फलंदाजी करताना पॉल स्टर्लिंगच्या रूपाने आयर्लंडला पहिला धक्का बसला. त्याला मार्क वुडने सॅम कुरनच्या हाती झेलबाद केले. स्टर्लिंगने आठ चेंडूंत १४ धावा केल्या. त्याच्यानंतर लॉर्कन टकर पॅव्हेलियनमध्ये परतला. २७ चेंडूत ३४ धावा करून टकर धावबाद झाला. त्याने बलबर्नीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. आयर्लंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. १५७ धावसंख्येवर त्यांचा डाव संपुष्टात आला.
Rain has stopped play at the MCG 🌧
England are five runs behind on DLS against Ireland.#T20WorldCup | #IREvENG |📝: https://t.co/WuCy4jxWJS pic.twitter.com/6HWYU34eYc
— T20 World Cup (@T20WorldCup) October 26, 2022