Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवसेनेच्या माजी आमदाराचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

विनायक निम्हण हे शिवाजीनगर मतदार संघातून १९९९ आणि २००९ मध्ये निवडून आले होते.

0 598

पुणे : शिवसेनेचे पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्याच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे. विनायक निम्हण हे शिवाजीनगर मतदार संघातून १९९९ आणि २००९ मध्ये निवडून आले होते.

Jawale Jewellers

पुणे येथील शिवाजीनगर मतदार संघातून ते १९९९ साली आमदार म्हणून निवडून आले होते. निम्हण यांनी शिवसेना विभाग प्रमुख, पुणे शहर प्रमुख अशा विविध पदांवर काम केले होते. माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा त्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले होते. १९९९ ते २०१४ पंधरा वर्ष ते आमदार म्हणून निवडून आले होते.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.