Latest Marathi News

BREAKING NEWS

कपडे धुवायला गेलेल्या मावशी-भाचीचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू!

0 277

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात गोदावरी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी आणि भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अर्चना सोनवणे (वय ३५ वर्षे, राहणार नाशिक) आणि गौरी शिंदे (वय १८ वर्षे, राहणार म्हसरुळ नाशिक) असे मयत झालेल्या मावशी आणि भाचीचे नाव आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, अर्चना सोनवणे आणि गौरी शिंदे या दोघी कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे दिवाळीच्या सुट्टी निमित्त मंगेश चव्हाण यांच्या येथे मामाच्या गावी आल्या होत्या. आज सकाळी गोदावरी नदीला पाणी असल्याने गावातील काही महिला आणि एक मुलगा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी मावशी आणि भाचीचा पाय घसरून ते नदी पात्रात पडले.

Manganga

 

 

त्यांना वाचवण्यासाठी इतर 3 महिलांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांना देखील पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडणार असल्याचे समजल्यावर जवळच असलेल्या एका मुलाने पाण्यात उडी मारून तीन महिलांना वाचवले. मात्र, या दोघींनाही वाचवण्यात त्याला अपयश आले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पाण्यातुन बाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघींना त्यांना मृत घोषित केले.

 

दरम्यान, याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.