Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्य सरकारचे टेन्शन वाढणार: बच्चू कडू 12 आमदारांसोबत मोठा निर्णय घेणार?

0 575

 

Jawale Jewellers

अमरावती : सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद सध्या वाढला असून मोठा निर्णय घेण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

 

Manganga

बच्चू कडू म्हणाले, “येत्या १ तारखेपर्यंत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत. जर एका बापाची औलाद असेल, तर तो पुरावे देईल. जर नाही दिले तर त्याच्या (रवी राणा) नावाची आम्ही घोषणा करणार, मला काही आमदारांचे फोन आले, त्यांच्याही अस्तित्वाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. विरोधक 50 खोके बोलत होते तिथपर्यंत ठीक होते. पण आमच्यातीलच माणसं असं बोलले तर खोके घेऊन शिंदे यांच्यासोबत गेलो असा प्रचार होत आहे. त्यामुळे 1 तारखेला आम्ही आमच्यासोबत असलेले 12 आमदार निर्णय घेणार आहोत, असे बच्चू कडू यांनी वक्तव्य केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.