Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : शेरेवाडी पाटीजवळ अपघात : एकजण जागीच ठार

0 1,574

Jawale Jewellers
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील शेरेवाडी पाटी जवळ झालेल्या अपघाता मध्ये सांगोला तालुक्यातील इटकी येथील एकजण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

 

Manganga
याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला तालुक्यातील इटकी येथील पोपट श्रीमंत सावंत (वय ५० वर्षे) हे ट्रॅक्टरसाठी ट्रॉली आणण्याकरिता कोल्हापूर कडे निघाले होते.

 

यावेळी ते शेरेवाडी पाटी जवळ आले असता पाठीमागून येणाऱ्या टेम्पो ने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये पोपट श्रीमंत सावंत यांचा जागीच मृत्यू झाला.

 

सदर अपघाताचा पंचनामा आटपाडी पोलिसांनी केला असून, घटनेची नोंद आटपाडी पोलिसात झाली आहे. ऐन दिवाळी मध्ये झालेल्या अपघातामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.