बारामती : राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे बारामतीत गोविंद बाग या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोठे वक्तव्य केले.
यावेळी त्या म्हणाल्या, ‘शंभुराज देसाई म्हणतात पुढचे 25 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही. पण त्यांनी 25 वर्षाच्या सत्तेची भाषा करू नये, मुळात आत्ताच जे सरकार सत्तेत आलं आहे. ते शिंदे-फडणवीस हे सरकार छळकपट हिटलरशाही आणि दबाव यंत्रणांचा वापर करुन आलेले आहे. शिवाय महिना दोन महिन्यांमध्ये काय परिस्थिती होतेय ते बघा. हे सरकार परत उलटणार आणि महाविकास आघाडी परत सत्तेत येणार आहे.

आमदार सांभाळणं महाराष्ट्राचा कारभार सांभाळणं तेवढं सोप्प नाही ते फक्त अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सिद्ध करून दाखवलं होतं. राज्य सांभाळनं एकनाथ शिंदे यांना जमणार नाही असे रुपाली ठोंबरे यांनी वक्तव्य केले.