अमरावती : मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस अमरावती शहरातील संमती शिक्षक कॉलनीत मायलेकींनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुण मुलीचे नाव मृणाल वानखडे आहे तर सोबत आत्महत्या करणाऱ्या तिच्या आईचे नाव सुवर्णा वानखडे आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मुलगी मृणाल आणि तिची आई सुवर्णा या प्रदीप वानखडे यांच्यासोबत राहत होत्या. सुवर्णा वानखडे या 51 वर्षांच्या होत्या. तर मृणाल वानखडे या 25 वर्षांच्या होत्या. प्रदीप वानखेडे हे शिक्षक म्हणून काम करतात. त्यांची मुलगी इंजिनिअरींग पूर्ण झाल्यानं पुण्यातील एका कंपनीत नोकरीला लागली होती. प्रदीप वानखडे यांनी शारिरिक आणि मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे आई-मुलीने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रदीप यांचं वय 55 वर्ष आहे. सध्या पोलिसांनी प्रदीप वानखेडे यांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.तसेच, अमरावती पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.